शेतकऱ्यांचं रस्त्यावर संत्र फेकून आंदोलन, संतप्त बळीराजानं काय केली सरकारकडे मागणी?
VIDEO | अमरावतीच्या चांदूरबाजार येथे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्र रस्त्यावर फेकून केला निषेध, मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होत असल्याने बळीराजा हवालदिल, आक्रमक शेतकऱ्यानं सरकारकडे काय केली मागणी?
अमरावती, १४ ऑगस्ट २०२३ | गेल्या काही दिवसांपासून जोरदार पावसानं राज्याला झोडपलं आहे. मुसळधार पावसाने राज्यातील अनेक जिल्ह्यांना चांगलंच संकटात टाकलं होतं. अशात आता पावसाने उसंत घेतली असताना अमरावती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून संताप व्यक्त केल्याचे पाहायला मिळत आहे. अमरावती संत्रा उत्पादक शेतकऱ्यांनी संत्रा रस्त्यावर फेकून सरकारचा निषेध केला आहे. अमरावतीत मोठ्या प्रमाणात संत्र्याची गळती होते आहे. यावर कोणत्याच उपाय योजना शेतकऱ्यांना कृषी विभागाने सुचवलं नसल्याने शेतकरी आक्रमक होत संतप्त झाले आहेत. अमरावतीच्या चांदूरबाजार येथे शेतकऱ्यांनी संत्र रस्त्यावर फेकून निषेध केला आहे. झालेल्या मिश्रणाची भरपाई देखील सरकारने द्यावी, अशी मागणी देखील शेतकऱ्यांनी केली.
राऊत पुन्हा शिवतीर्थवर, राज ठाकरेंसह युती, जागावाटप नेमकी कशावर चर्चा?
300 GB डेटा अन् 95 हजार फोटो... Epstein वरून पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
कुठं बोगस मतदार, कुठं पैशांचं वाटप तर..; अंबरनाथमध्ये मतदानाला गालबोट
निवडणूक आयोग नालायक... विजय वडेट्टीवार यांची तीव्र शब्दांत टीका

