AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Amravati | अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हणून पालकांनीच केलं डोकं चक्रावणारं कृत्य

Amravati | अमरावतीत पुन्हा भयंकर घडलं, अज्ञात मुलगा लेकीला वाईट नजरेने पाहतो म्हणून पालकांनीच केलं डोकं चक्रावणारं कृत्य

| Updated on: Apr 25, 2026 | 12:10 PM
Share

अमरावतीतील परातवाडा प्रकरण आणखी खोलवर जात असतानाच अमरावतीतच एक धक्कादायक प्रकार घडला.आई वडीलांसह राहणाऱ्या मुलीवर एक अज्ञात मुलगा वाईट नजरेने पाहत असे. आपल्या मुलीवर कोणी वाईट नजर टाकू नये या कारणाने आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलत तिचे केस कापून टाकले.

अमरावतीतील परातवाडा प्रकरण आणखी खोलवर जात असतानाच अमरावतीतच एक धक्कादायक प्रकार घडला.आई वडीलांसह राहणाऱ्या मुलीवर एक अज्ञात मुलगा वाईट नजरेने पाहत असे. आपल्या मुलीवर कोणी वाईट नजर टाकू नये या कारणाने आई-वडिलांनी टोकाचे पाऊल उचलत तिचे केस कापून टाकले. तिने विरोध करताच तिला मारहाण केल्याची माहिती समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी आपल्या आई-वडिलांसोबत राहत होती. मुलं तिच्याकडे चुकीच्या नजरेने पाहतात, अशी पालकांची समजूत झाली होती. याच भीतीतून त्यांनी घरातच ट्रिमरने मुलीचे टक्कल केले. या घटनेमुळे मुलगी घाबरून गेली आणि मानसिकदृष्ट्या अस्वस्थ झाली.

यानंतर तिने थेट पोलिस ठाण्यात जाऊन आई-वडिलांविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी प्रकरणाची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

Published on: Apr 25, 2026 12:10 PM
Follow Us