Amruta Fadnavis : कोणतही बंधू एकत्र आले तर आनंदच – अमृता फडणवीस
Amruta Fadnavis News : अमृता फडणवीस यांनी हिंदी भाषा सक्ती आणि ठाकरे बंधु युतीच्या मुद्यावर प्रतिक्रिया दिली आहे.
आम्ही प्रेम प्रमोट करतो, असं अमृता फडणवीस यांनी म्हंटलं आहे. कोणतेही बंधु एकत्र आले, दूरचे लोक जवळ आले तर यात आनंदच आहे, असंही त्यांनी म्हंटलं आहे. ठाकरे बंधूंच्या युतीवरील प्रश्नावर अमृता फडणवीस यांनी हे उत्तर दिलं आहे. तर लहानपणी मुलं भाषा लवकर शिकू शकतात. त्यामुळे हिंदी भाषेचाही समावेश असावा, अनेक भाषांचा समावेश असावा, असंही अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या.
यावेळी बोलताना त्यांनी म्हंटलं की, भारतात उत्तर दक्षिण पूर्व पश्चिम कोण जोडतं तर हिंदी. त्यामुळे मला असं वाटतं की हिंदी ही अशी भाषा आहे, जीचा समावेश असावा आणि इतरही भाषांचा समावेश असावा. लहानपणी मुलं भाषा लवकर शिकतात. त्यामुळे त्यांना जेवढं जास्त भाषा शिकवता येतील तेवढं शिकवावं. ते मुलांसाठीच चांगलं आहे, असं मत अमृता फडणवीस यांनी व्यक्त केलं.

मराठा कार्यकर्ते आणि मंत्री सरनाईक यांच्यात शाब्दिक चकमक, पाहा VIDEO

ती कौटुंबिक मुलाखत, त्यावर .. ; मंत्री प्रताप सरनाईकांचा हल्लाबोल

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी 24 जुलैला चक्का जाम, बच्चू कडू यांचा इशारा

जुनी म्हण आहे, मुंबईत ठाकरे..; मनोज जरांगेंचं ठाकरेंच्या युतीवर विधान
