केंद्र सरकारकडून आवाज दाबण्याचा प्रयत्न- वर्षा गायकवाड
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे […]
सोनिया गांधी यांनी ईडीची नोटीस दिल्याच्या निषेधार्थ ककोंग्रेसने आज देशव्यापी मोर्चा काढला. मुंबई येथे निघालेल्या मोर्चामध्ये माजी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. सरकारच्या विरोधात बोलणाऱ्यांवर यंत्रणांचा दबाव आणून आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला. सरकार जीएसटी, महागाईच्या आणि बेरोजगारीच्या विषयावर काहीच बोलत नाही, महागाईमुळे सर्वसामान्यांचे हाल होत असल्याचे गायकवाड म्हणाल्या. गेल्या सात वर्षात कुठलीच नोटीस पाठविली नाही मग आताच आठवण कशी झाली असा प्रश्नही त्यांनी विचारला. केंद्र सरकारच्या विरोधात आवाज उठविल्यामुळे सरकारी यंत्रणांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप वर्षा गायकवाड यांनी केला.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
