Maharashtra Flood | महाराष्ट्रात पुरग्रस्त 8 जिल्ह्यांसाठी अंदाजे सहा हजार कोटीचं नुकसान

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत. 

राज्यात महापूर आणि दरड कोसळल्यामुळे राज्यातील 8 जिल्ह्यात सहा हजार कोटींचं नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे नुकसानग्रस्तांना पॅकेजच्या रुपाने भरपाई देण्यासाठी राज्य सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.  राज्यातील 8 जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदतीसाठी अंदाजे 6 हजार कोटी रुपयांची गरज आहे. पुरामुळं कोकणातल्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर आणि विदर्भातील अकोला आणि अमरावतीमध्ये मोठं नुकसान झालं आहे. एकूण सहा हजार कोटींचं हे नुकसान झाल्याचा सरकारचा प्राथमिक अंदाज आहे. त्यामुळे पिकांची नुकसान भरपाई, रस्ते, वाहून गेलेल्या पुलांची बांधणी, कोलमडलेली वीज यंत्रणा उभी करणे, दरडी कोसळलेल्या गावांचं पुनर्वसन, लोकांना मदत आदींसाठी पॅकेज देण्याकरिता सरकारने हालचाली सुरू केल्या आहेत.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI