“तुम्ही परत या, मी पक्षातून बाहेर पडतो”, जितेंद्र आव्हाड यांच्या आवाहनाला अजित पवारांच्या गटातील नेत्याचं प्रत्युत्तर; म्हणाला…
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधण्यात आला. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. याला अजित पवार गटातील नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
ठाणे: उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बंड केल्यानंतर राष्ट्रवादीत दोन गट पडले आहेत. या दोन्ही गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. अजित पवार गटाकडून जितेंद्र आव्हाड आणि जयंत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. अशातच जितेंद्र आव्हाड यांनी बंड केलेल्या आमदारांना भावनिक साद घातली आहे. मी पक्षातून बाहेर पडतो. तुम्ही परत या, असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे. याला अजित पवार यांच्या गटातील नेते आनंद परांजपे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ते म्हणाले की, “आधीच योग्य वागले असते, तर ही वेळ आली नसती. वांद्र्यात झालेल्या सभेत अजित पवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. स्टेजवरून अजित पवार वारंवार शरद पवारांना आशीर्वाद देण्यासाठी विनंती करत होते.”
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा

