Anil Desai : केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर, संजय राऊतांच्या कारवाईवरुन खासदार अनिल देसाईंची टीका
पत्रचाळ पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना अटक करण्यात आली. यानंतर राज्यातील राजकीय वातावरण तापलं आहे.
मुंबई : खासदार संजय राऊत (Sanjay Raut Ed Inquiry) सध्या राजकीय वर्तुळात चर्चेत्या केंद्रस्थानी आहे. एका चाळीच्या पुनर्विकासात आर्थिक अफरातफर झाल्याच्या आरोपांखाली काल त्यांची 9 तास चौकशी झाली. पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी त्यांच्या झालेल्या या चौकशीनंतर राऊतांना ताब्यात घेण्यात आलं. त्यांना ईडीच्या कार्यालयात आणण्यात आलं. तिथे त्यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. यानंतर साडे बाराच्या सुमारास ईडीने त्यांना अटक केल्याची घोषणा केली. या सगळ्या घडामोडींनंतर सामनाचा अग्रलेख (Saamana Editorial) कोणत्या मुद्द्यावर भाष्य करणार याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष होतं. आजच्या सामनाच्या अग्रलेखातून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsingh Koshyari) यांच्यावर निशाणा साधण्यात आला आहे. तर दुसरीकडे खासदार अनिल देसाई यांनी देखील केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरुपयोग होत असल्याची टीका केली आहे. यामुळे पुन्हा एकदा राजकीय वातावरण ढवळून निघालंय.
Published on: Aug 01, 2022 11:17 AM
एक-एक टक्का देतो, आधी 40... शिंदेंच्या आमदाराचा व्हिडीओ व्हायरल; खळबळ
श्रीकांत शिंदेंसह ओमराजेंनाही मंत्रीपदाची लॉटरी? स्वतःच केला मोठा खुला
ओमराजे निंबाळकर विमानतळावर पोहोचण्यापूर्वीच भयंकर घडलं; थेट पोलीस
देवेंद्रजी हुशार, कपटी मित्र...एकनाथ शिंदेंची ठाकरेंवर बोचरी टीका, नेम
