‘खरचं महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रेम असेल तर आधी भिडे यांना अटक करा’; काँग्रेस नेत्याचा भाजपवर पलटवार
त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या चले जाव नाऱ्यावरून आपली मनोगते स्पष्ट केली. यावेळी फडणवीस यांनी देखील त्यांच्या भाषणात 'महात्मा गांधी यांनी चले जावचा नारा देताना करो या मरो हा नारा देखील दिला होता.
नागपूर, 9 ऑगस्ट 2023 । ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती दिनाच्या औचात्याने ऑगस्ट क्रांती मैदानात आज राज्य शासनाकडून महात्मा गांधी यांनी अभिवादन करण्यात आलं. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी महात्मा गांधी यांच्या चले जाव नाऱ्यावरून आपली मनोगते स्पष्ट केली. यावेळी फडणवीस यांनी देखील त्यांच्या भाषणात ‘महात्मा गांधी यांनी चले जावचा नारा देताना करो या मरो हा नारा देखील दिला होता. ते होते म्हणून आपण आहोत आणि त्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्याचे म्हटलं. त्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी शिंदे-फडणवीस-पवार सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी देशमुख यांनी जर तुम्हाला महात्मा गांधी यांच्याबद्दल प्रेम असेल त्यांच्या बद्दल आदर असेल तर आधी ज्यांनी त्यांचा अपमान केला त्यांना अटक करा अशी मागणी केलीय. त्यांनी, संभाजी भिडे गुरुजीसारखे लोक महात्मा गांधी, महात्मा फुले यांचा अपमान करतात त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. तर ऐतिहासिक ऑगस्ट क्रांती मैदानात जाऊन भाषण दिलं जातायेत. आधी भिडे यांना अटक करा.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

