Anil Deshmukh | माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपुरातील घरावर ईडीची छापेमारी

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Jun 25, 2021 | 11:19 AM

अजित पवार यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे मारले गेले आहेत.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांच्या घरावर ईडीने छापेमारी केली आहे. आधी सीबीआयने अनिल देशमुख यांच्या घरावर छापा टाकला होता. त्यानंतर महिनाभरातच ईडीनेही देशमुखांच्या नागपुरातील घरावर धाड टाकली आहे. विशेष म्हणजे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची सीबीआय चौकशी करण्याचा ठराव कालच भाजपच्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीत झाला होता. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीचे दिग्गज नेते अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीने छापे टाकल्यामुळे राजकीय वर्तुळात कुजबूज वाढली आहे.

अनिल देशमुख यांच्यावर वसुली आदेशाचा गंभीर आरोप परमबीर सिंह यांनी केला होता. त्यानंतर मुंबई हायकोर्टाच्या आदेशानुसार सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. या गुन्हाच्या अनुषंगाने ईसीआयर (Enforcement Case Information Report म्हणजेच ECIR) दाखल करत ईडीने तपास सुरु केला होता. ईडीने आज सकाळी (शुक्रवारी) पावणे आठच्या सुमारास देशमुखांच्या नागपुरातील घरी छापेमारी केली. यावेळी केंद्रीय सुरक्षा यंत्रणा सीआरपीएफचे जवान मोठ्या प्रमाणात तैनात होते. पाच अधिकाऱ्यांमार्फत हे धाडसत्र सुरु झाले. यावेळी अनिल देशमुख घरी नव्हते, तर त्यांची पत्नी आणि इतर कुटुंबीय उपस्थित होते.

 

Follow us

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI