Adv. Jayshree Patil | अनिल देशमुख यांना जामीन मिळणार नाही, अॅड.जयश्री पाटील यांना विश्वास
महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीनं अटक केल्यानंतर तक्रारदार अॅड. जयश्री पाटील यांनी त्यांच्या जीविताला धोका असल्याचं म्हटलं आहे. अनिल देशमुख यांच्या प्रकरणी शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांची देखील भूमिका तपासण्यात यावी, अशी मागणी जयश्री पाटील यांनी केली आहे.

जयश्री पाटील नेमकं काय म्हणाल्या?
भारत माता की जय, आज ईडीनं सेक्शन 19 नुसार अनिल देशमुख यांना अटक केली आहे. मी सीबीआय आणि ईडीकडं दिलेल्या तक्रारीनुसार अनिल देशमुख यांना अटक झाली आहे. माझ्या तक्रारीचा अभ्यास केल्यास त्यामध्ये शरद पवारांचा उल्लेख आहे आणि सुप्रिया सुळे यांचा ही रोल तपासण्याची गरज आहे. सेक्शन 59 नुसार ईडीनं नोटीस देऊनही अनिल देशमुख हजर झाले नाहीत. अनिल देशमुख कुठंही दिलासा मिळत नसल्यानं ईडीसमोर हजर झाले. अनिल देशमुख यांचा गैरव्यवहार सिद्ध झाल्यानं ईडीनं त्यांना अटक केली असल्याचं जयश्री पाटील म्हणाल्या.
हा महाराष्ट्राचा तोटा, 1 नंबरचा आमचा माणूस... जयंत पाटील काय म्हणाले?
चलान कट करताना होणारे वाद आता मिटणार, कारण...फडणवीस यांची मोठी घोषणा
अण्णा हजारे यांचा तपोवनातील वृक्षतोडीला विरोध; म्हणाले, कुंभमेळा....
"'लाडकी बहीण' बंद व्हावी म्हणून कोर्टात जाणारा नानांचा माणूस..."