Anil Parab | …..तर 100 कोटींचा दावा ठोकणार, सोमय्या प्रकरणी अनिल परब आक्रमक

आता सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता अनिल परब आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी 100 कोटींचा दावा किरीट सोमय्या यांच्यावर ठोकला आहे. यामुळे आता सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. 

परिवहन मंत्री अनिल परब यांनी अनधिकृत बांधकाम केल्याचा आरोप भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी 2019 मध्ये केला होता. त्यानुसार त्यांनी लोकायुक्तांकडे तक्रार केली होती. परब यांनी वांद्रे पूर्वेकडील गांधी नगर येथील इमारत क्रमांक 57 आणि 58 मधील मोकळ्या जागा बळकावून अनधिकृत बांधकाम केले असल्याची तक्रार सोमय्या यांनी केली होती. तसेच आता सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन अनिल परब यांच्यावर आरोप केले. त्यानंतर आता अनिल परब आक्रमक झालेले दिसत आहेत. त्यांनी 100 कोटींचा दावा किरीट सोमय्या यांच्यावर ठोकला आहे. यामुळे आता सोमय्या यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

 

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI