संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप असेल तर मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ विधानाचीही दखल घ्या; ठाकरेगटाचा पलटवार
अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी सत्ताधारी पक्षाने चहापानाच्या कार्यक्रमासाठी विरोधकांना आमंत्रित केलं होतं. तेव्हा विरोधकांनी या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. यावर बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधरकांना देशद्रोही संबोधलं. त्यावर आता अनिल परब यांनी आक्षेप घेतला आहे.
मुंबई : खासदार संजय राऊत यांच्या विधानावर आज विधिमंडळ अधिवेशनात आक्षेप घेण्यात आला. याला ठाकरेगटाचे आमदार अनिल परब यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. “सभागृहाचा अपमान होऊ नये. या मताशी आम्ही सहमत आहोत. हा अपमान कोणत्या पक्षाच्या व्यक्तीने केला हा मुद्दा जास्त महत्वाचा नाहीये. आम्ही या बाबतीत सहमत आहोत. पण ज्या पद्धतीने संजय राऊत यांच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला जातोय. चोरमंडळ म्हणून उल्लेख केल्यावर जसं सत्ताधाऱ्यांनी आक्षेप घेतलाय. तसं विरोधी पक्षातील नेत्यांना देशद्रोही म्हणण्याचा विषय देखील तेवढाच गंभीर आहे. याचीही नोंद घेण्यात यावी. सभागृहात एक ठराव पारित करून टाका. जेव्हा विधिमंडळाचा अपमान होईल तेव्हा सगळ्यांना सारखा न्याय मिळेल”, असं अनिल परब म्हणालेत.
शिंदे सेना नाही थेट शिवसेना बोलायच, भर सभागृहात बड्या मंत्र्याचा संताप
गुलाम म्हणत ठाकरेंची नाव न घेता शिंदेंवर टीका...शिवसेनेकडूनही पटलवार
लोकलनं उद्या प्रवास करताय? तिन्ही रेल्वे मार्गावर कसा असणार मेगाब्लॉक?
राऊतांनी सत्ताधाऱ्यांची काढली लाज, विरोधी पक्षनेतेपदावरून घणाघाती टीका

