तर शेतकऱ्यांना आत्महत्या करावी लागेल; धनंजय मुंडेंना पुन्हा मंत्रिमंडळात? काय म्हणाल्या दमानिया
सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे.
या प्रकरणात भ्रष्टाचाराचा मुद्दा कुठेही उपस्थित करण्यात आलेला नाही, त्यामुळे धनंजय मुंडे यांना क्लीन चीट मिळालेली नाही. या संपूर्ण प्रकरणाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्याची गरज आहे, असं सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकाळात कृषी विभागात मोठा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. तब्बल 200 कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा भाजप आमदार सुरेश धस यांनी केला होता. तर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे हे कृषीमंत्री असताना सुमारे 245 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप केला होता. मात्र, आता मुंबई उच्च न्यायालयानं धनंजय मुंडेंना मोठा दिलासा दिला आहे. त्यानंतर आज अंजली दमानिया यांनी पत्रकार परिषद घेत भाष्य केलं.
त्यांनी पुढे म्हटलं की, माझा लढा लोकायुक्तांसमोर सुरू आहे. “सत्यमेव जयते” हे धनंजय मुंडे यांना शोभत नाही. तत्कालीन सचिव वी. राधा यांचा अहवाल कधीच सादर झाला नाही आणि त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली. आठ वेळा सचिवांनी हे सर्व चुकीचे असल्याचे नमूद केले होते.
दमानिया पुढे म्हणाल्या, धनंजय मुंडे यांनी पुन्हा मंत्रिमंडळात परतू नये, अशी विनंती मी देवेंद्र फडणवीस यांना करते. महाराष्ट्राचे दुर्दैव आहे की, प्रथम धनंजय मुंडे आणि नंतर माणिकराव कोकाटे यांच्यासारखे कृषीमंत्री मिळाले. याचिकाकर्त्यांनी चुकीच्या पद्धतीने मुद्दे मांडले आणि सरकारी वकिलांच्या गोंधळामुळे हे प्रकरण त्यांच्या बाजूने गेले, असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?

