Anjali Damania : गुन्हे दाखल असताना सुपेकरांच्या मेहुण्याचं प्रमोशन कसं? दमानियांकडून एकच मागणी, म्हणाल्या….
एक पेक्षा अधिक गुन्हे दाखल असताना जालिंदर सुपेकर यांचे मेव्हुणे शशिकांत चव्हाण यांची बढती कशी झाली? असा सवाल सध्या केला जात आहे. यावरूनच अंजली दमानिया यांनी भाष्य करत एक मागणी केली आहे.
जालिंदर सुपेकर यांच्यामुळेच वादग्रस्त मेहुण्याचं प्रमोशन झालं का? अशी चर्चा सध्या सुरू आहे. जालिंदर सुपेकर यांचे मेव्हुणे शशिकांत चव्हाण हे वादग्रस्त पोलीस अधिकारी असून शशिकांत चव्हाण हे खडक पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आहेत. जालिंदर सुपेकर यांचे मेहुणे शशिकांत चव्हाण यांच्यावर यापूर्वी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी नारायणगाव, हाणमारी आणि जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी ॲट्रॉसिटीचा खेड मंचर येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय. हे गुन्हे दाखल असून देखील त्यांचं प्रमोशन कसं काय झालं? यामागे जालिंदर सुपेकर आहेत का? असा सवाल केला जात असताना सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी याप्रकरणी एक मोठी मागणी केली आहे. जालिंदर सुपेकर असो किंवा शशिकांत चव्हाण असो हे पोलीस अधिकाऱ्यांच्या नावाला कलंक आहे. त्यामुळे निलंबित करा आणि चौकशी करा, अशी मागणी दमानिया यांनी केली.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट

