Anjali Damaniya : आयजी जालिंदर सुपेकरांच्या नावाने हगवणे सुनांना धमकवायचे; दमानियांचा आरोप
Anjali Damaniya Allegations on IG Supekar : वैष्णवी हगवणे प्रकरणात अंजली दमानिया यांनी आयजी सुपेकर यांच्यावर गंभीर आरोप केले असून ऑडिओ क्लिप देखील ऐकवली आहे.
अंजली दमानिया यांच्याकडून ऑडिओ क्लिप ऐकवत आयजी जालिंदर सुपेकरांवर गंभीर आरोप करण्यात आलेले आहेत. जुन्या प्रकरणातील ऑडिओ क्लिप ऐकवून सुपेकर चुकीच्या पद्धतीने काम करत असल्याचा आरोप दमानिया यांनी केला आहे. तसंच सुपेकर यांचे हगवणे कुटुंबाशी जवळचे संबंध असून हगवणे यांनी सुनांना सुपेकर यांचा धक दाखवला असल्याचा देखील आरोप अंजली दमानिया यांनी केला आहे. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुपेकरांना फोन करून सक्त ताकीद दिलेली असल्याचं रूपाली पाटलांनी म्हंटलं आहे.
अंजली दमानिया यांनी म्हंटलं आहे की, मयूरीच्या आईने महिला आयोगाला आयजी सुपेकर यांच्या विरोधात पत्र लिहिलं होतं. त्यात नमूद केलेलं आहे की, मयूरी आणि तिच्या कुटुंबाला सुपेकर तसंच काही राजकारण्यांचा धाक दाखवून त्रास दिला जात होता, असं म्हणत दमानिया यांनी त्य पत्राची प्रत दाखवली आहे. तर दुसरीकडे अजित पवार गटाच्या रूपाली पाटील यांनी म्हंटलं आहे की, अजित पवार यांनी सुपेकर यांना सक्त ताकीद देऊन या प्रकरणाच्या चौकशीत त्यांचं नाव समोर आलं तर त्यांच्यावर कारवाई होईल, असं सांगितलं आहे.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..

