‘कर्माचे फळ चुकत नाही, ह्याच जन्मात…,’ चाकणकरांच्या राजीनाम्यावर दमानिया यांची प्रतिक्रीया
नाशिकचे भोंदू बाबा अशोक खरात प्रकरण आता राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना चांगलच भोवले आहे. महिला आयोगाच्या अध्यक्षपदानंतर अखेर त्यांना राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. त्यावर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे.
नाशिकच्या भोंदू अशोक खरात प्रकरणात अखेर राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांना आपल्या राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. या आधी रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला होता. आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा रुपाली चाकणकर यांनी एका ओळीत दिला आहे, या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका करताना एक्सवर एक पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये त्या म्हणतात की, ‘सुनेत्रा पवार मनात म्हणत असतील “मी तर वाटच पाहत होते”. हा राजीनामा समर्पित ……डॉ. संपदा मुंडे यांना, ज्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवायचा प्रयत्न चाकणकर यांनी केला. त्या प्रत्येक महिलेला ज्यांच्या वेदनांना न्याय मिळाला नाही. त्यांनाही ज्यांची प्रकरणे दाबली गेली.कर्माचे फळ चुकत नाही. ह्याच जन्मात भोगावं लागतं असे दमानिया यांनी पोस्ट करत म्हटले आहे.
Published on: Mar 28, 2026 09:58 AM
ECI विरोधात 2 ऑक्टोबरला सीजेपीचं आंदोलन; पोलिसांनी परवानगी नाकारली तरी
बसचा ब्रेक फेल अन् थेट रिक्षा-कारला धडकली; बेलापूरमध्ये भीषण अपघात
विश्रांतवाडी अत्याचार प्रकरणावरून सुषमा अंधारे आक्रमक, थेट....
सासवडच्या पिण्याच्या पाण्यात अळ्या-किड्यांचे साम्राज्य; मुख्य जलवाहिनी

