Anna Hajare : अण्णा हजारेंचा पहिल्यांदाच केजरीवालांवर हल्लाबोल..! काय आहे कारण?
दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
अहमदनगर : (Anna Hajare) अण्णा हजारे यांना आपले गुरु मानणारे (Arvind Kejariwal) अरविंद केजरीवाल हे आता (Delhi CM) दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर अण्णा हजारे यांनी त्यांच्याबद्दल बोलणे हे टाळलेलेच आहे. पण आता मुख्यमंत्री केजरीवाल यांनी दारु विक्रीबाबत घेतलेले धोरण हे अण्णा हजारे यांना पटलेले नाही. दिल्ली सरकारने दारुबाबत घेतलेले धोरण म्हणजे तरुणांना दारु पिण्यासाठी एकप्रकारे आमंत्रित केल्या सारखेच आहे. दारु पिण्यासाठी याआगोदर 25 वयोवर्षाची अट होती ती आता केवळ 21 वर आणली गेली आहे. अरविंद केजरीवाल यांचे हेच धोरण अण्णा हजारे यांना पटलेले नाही. त्यामुळे त्यांनी एक पत्र लिहलेले आहे. शिवाय वेळ पडली तर आपण त्यांना याबद्दल बोलणार ही असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
महिला आरक्षणावरून कोल्हेंचा हल्लाबोल; सत्ताधाऱ्यांना अप्रत्यक्ष टोला
विधेयकाचं क्रेडिट तुम्ही घ्या, आम्ही ब्लँकचेक... मोदी असं का म्हणाले?
महिलांच्या अधिकारांना विरोध करणाऱ्यांना महिलांनीच उत्तर दिलं – मोदी
पोटनिवडणुकीत नवा ट्विस्ट; सुनेत्रा पवार मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये?

