Donald Trump : ट्रम्प यांच्या आक्षेपांना न जुमानता अॅपलचे भारताला वचनबद्धतेचे आश्वासन
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आक्षेपांना न जुमानता अॅपलने भारताला वचनबद्धतेचे आश्वासन दिले आहे.
भारतातील उत्पादन आणि गुंतवणूक योजना अबाधित राहतील. राजकारणाची नाही, तर स्पर्धेची चिंता आहे, असं डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानंतर अॅपलच्या एका अधिकाऱ्याने प्रतिक्रिया देताना स्पष्ट केलं आहे. भारत आमच्या जागतिक पुरवठा साखळीच एक महत्वाचा भाग असल्याचं देखील अॅपलने म्हंटलं आहे.
दरम्यान, भारतात अॅपलचे कारखाने उभारू नका असा सल्ला अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलचे सीईओ टीम कुक यांना दिला होता. मी भारतात उत्पादनामध्ये इच्छुक नाही, असंही ट्रम्प यांनी म्हंटलं होतं. मात्र आता डोनाल्ड ट्रम्पच्या आक्षेपांना न जुमानता अॅपलने भारताला वचनबद्धतेचे आश्वासन दिले आहे. ट्रम्प यांनी कंपनीच्या भारत धोरणावर टीका केली असूनही व्यवसाय नेहमीप्रमाणे सुरू असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप

