VIDEO : Army Helicopter Crash| तामिळनाडूत आर्मीचं हेलिकॉप्टर क्रॅश, 4 मृतदेह सापडले, वायुसेनेचे चौकशीचे आदेश

तामिळनाडूमध्ये आर्मीचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आतापर्यंत 4 मृतदेह सापडले आहेत. वायुसेनेकडून चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली.

तामिळनाडूमध्ये आर्मीचे हेलिकॉप्टर क्रॅश झाले आहे. आतापर्यंत 4 मृतदेह सापडले आहेत. वायुसेनेकडून चौकशीचे आदेश देखील देण्यात आले आहेत. कुन्नूरच्या घनदाट जंगलात चारही बाजूने झाडच झाडं आहेत. हा अपघात अत्यंत भीषण होता. अपघात होताच जंगलात आग लागली. या दुर्घटनेची माहिती मिळतात हवाई दल आणि लष्कराची पथकं घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी रेस्क्यू ऑपरेशन सुरू केलं. हेलिकॉप्टर दुर्घटनेनंतर आगाची भडका उडाला. त्यामुळे या दुर्घटनेत काही जण होरपळले आहेत. काही जणांचे मृतदेह मिळाले असून ते 80 टक्के भाजलेले असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, या दुर्घटनेनंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्यास सुरुवात केली आहे.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI