Special Report | Maharashtra आणि Gujarat बद्दल Arvind Kejriwal काय बोलले?-tv9
भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय.
द काश्मिर फाईल्स या चित्रपटावरुन सध्या देशभरात जोरदार राजकारण पाहायला मिळत आहे. राजकारणासोबतच या चित्रपटाला मिळणारा लोकांचा प्रतिसाद आणि कमाईच्या आकड्यांवरुन चर्चेत आहे. काही भाजपशासित राज्यात हा चित्रपत करमुक्त करण्यात आलाय. दिल्लीतही भाजपकडून द काश्मिर फाईल्स करमुक्त करण्याची मागणी करण्यात आली. त्यावरुन विधानभेत बोलताना आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी भाजप आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय. ‘8 वर्ष देश चालवल्यानंतर जर कुठल्या पंतप्रधानांना विवेक अग्निहोत्रीच्या पायाशी लोळण घ्यावे लागले, तर त्याचा अर्थ होतो की 8 वर्षे त्या पंतप्रधानांनी काहीही काम केलेलं नाही’, अशा शब्दात केजरीवाल यांनी मोदींवर हल्ला चढवला.
महापौरपदाच्या आरक्षणाने इच्छुकांच्या आशांवर पाणी; पुण्यात मोठा ट्विस्ट
मुंबईत आवाज भाजपचाच... खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी महापौरपद राखीव
29 महापालिकांच्या महापौरपदासाठी आरक्षण सोडत निघाली आहे
छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप–शिंदे सेनेची युती 24 तासांतच कोसळली?

