AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

Asha Bhosle | साश्रू नयनांनी अखेरचा निरोप, स्वरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन

| Updated on: Apr 13, 2026 | 6:05 PM
Share

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं काल (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवजी पार्क स्मशानभूमित अंत्यसंस्कार...

ज्येष्ठ पार्श्वगायिका आशा भोसले यांचं काल (रविवार, 12 एप्रिल) निधन झालं. दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्या 92 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पार्थिवावर दादरच्या शिवजी पार्क स्मशानभूमित अंत्यसंस्कार…

सिनेसृष्टीतील अनेक कलाकर आणि राजकीय नेत्यांनी आशा भोसले यांचे अंतिम दर्शन घेतले. शिवाजी पार्कच्या स्मशानभूमीत त्यांत्यावर अंत्यसंस्कार झाले असून त्या अनंतात विलीन झाल्या, मात्र त्यांच्या आठवणी त्यांची सदाबहार गाणी चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहतील.

मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना तातडीने मुंबईतील ब्रीचकॅन्डी रुग्णालय येथे दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. आशा भोसले यांच्या पार्थिवावर आज दुपारी 4 वाजता छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याआधी त्यांचे पार्थिव लोअर परेल येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले आहे.

Published on: Apr 13, 2026 06:05 PM
Follow Us