चांगला पाऊस पडू दे… पुण्यातील प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी भाविकांची प्रार्थना
आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त पुण्यातील विठ्ठल वारीचे प्रति पंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री विठ्ठल मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. विठुरायाच्या दर्शनासाठी पुणे शहरासह परिसरातील हजारो वारकरी आणि भाविक मंदिरात दाखल झाले असून, दर्शनासाठी लांबच लांब रांगा लागल्या आहेत.

आषाढी एकादशीच्या निमित्ताने “विठ्ठल… विठ्ठल…” आणि “ज्ञानोबा-तुकाराम”च्या जयघोषात मंदिर परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला आहे. टाळ-मृदंगाच्या गजरात वारकरी विठुरायाच्या दर्शनाचा आनंद घेत आहेत.
दरम्यान, दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी राज्यात चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांचे वर्ष सुखाचे जावे तसेच सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा, अशी प्रार्थना श्री विठ्ठल चरणी केली. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुण्यातील या मंदिरात दिवसभर भाविकांची गर्दी कायम राहण्याची शक्यता असून, प्रशासनाकडून आवश्यक सुविधा आणि सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.
Published on: Jul 25, 2026 12:04 PM
चांगला पाऊस पडू दे... प्रति पंढरपूर मधील विठुरायाच्या चरणी प्रार्थना
अभिजीत दीपकेंबाबत सर्वात मोठी अपडेट समोर; स्वतःच व्हिडीओ शेअर करत...
दिल्लीच्या चर्चांवर मुख्यमंत्री फडणवीसांनी मौन सोडलं; दिलं थेट उत्तर!
केंद्रात मोठ्या हालचाली! स्वतः पंतप्रधान... 24 तासात 6 मोठे निर्णय