Pandharpur Wari 2025 : देह विठ्ठल विठ्ठल झाला.. पंढरपुरात लोटला भक्तीचा अलोट सागर
Pandharpur Wari 2025 News : आषाढी वारी निमित्ताने पंढरपूर येथे विठूरायच्या दर्शनासाठी भक्तांची गर्दी गोळा झाली आहे.
आषाढी वारी निमित्ताने पंढरपूर नगरी पांडुरंगाच्या जयघोषाने दुमदुमून गेलेली बघायला मिळत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज पहाटे 2:30 वाजता विठ्ठल राखुमाईची शासकीय पूजा संपन्न झाली. विठूरायच्या दर्शनासाठी भक्तांचा महासागर पंढरपुरात लोटला आहे. चंद्रभागेच्या तीरावर स्नानासाठी भाविकांची गर्दी झाली आहे.
आज आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठल रुक्मिणी मातेची शासकीय महापूजा संपन्न झाली. पत्नी अमृता फडणवीस यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विठ्ठलाची शासकीय महापूजा केली. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीचा आनंदोत्सव साजरा होत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत विठ्ठल रुक्मिणीच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी वारकरी पंढरी नगरीत दाखल झाले आहेत. संपूर्ण पंढरपूर हरिनामाच्या गजराने दुमदुमून गेले आहे. यावेळी विठ्ठलाच्या मूर्तीला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दुधाचा अभिषेक करण्यात आला. देवाला मुख्यमंत्र्यांनी आणलेला पोशाख परिधान करण्यात आला. त्यानंतर विठ्ठलाची आरती करण्यात आली. विठ्ठलाच्या पूजेनंतर रुक्मिणी मातेची देखील मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पूजा संपन्न झाली.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?

