संदेह गमला… रेडा कैसा बोलविला… जगद्गुरु तुकोबांच्या पालखीत चालणारा रेडा पाहिला काय?
संत तुकाराम महाराजांच्या पालखीत रेडा चालत असल्याचं पाहायला मिळालं. हा रेडा संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आळंदीपासून चालत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ज्ञानदेवांनी रेड्या मुखी वेद वदवले असा दृष्टांत दिला जातो. मात्र आळंदीपासून हा रेडा देहू करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी...
सोन्याच्या जेजुरीतील मुक्कामानंतर ज्ञानोबांच्या पालखीचं प्रस्थान हे वाल्हेकडे झालं आहे. दरम्यान, दौंड खिंडीत समस्त वैष्णवांचा मेळा हा न्याहारीसाठी विसावला होतो. यावेळी वाल्हेतील शेतकऱ्यांनी आणलेली भाजी, भाकरी आणि मिर्चीचा झणझणीत ठेचा खाऊन वारकऱ्यांनी आजची न्याहारी केली. तर दुसरीकडे संत तुकाराम महाराजांच्या पालखीत रेडा चालत असल्याचं पाहायला मिळालं. हा रेडा संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आळंदीपासून चालत असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, ज्ञानदेवांनी रेड्या मुखी वेद वदवले असा दृष्टांत दिला जातो. मात्र आळंदीपासून हा रेडा देहू करत संत तुकाराम महाराजांच्या पालखीत सहभागी झाला आहे. आळंदीपासून वारीत चालणाऱ्या या रेड्याच दर्शन घेताना वारकरी पाहायला मिळतायत. वारीत रेड्याच महत्त्व काय याविषयी वारकऱ्यांशी टीव्ही ९ मराठीने संवाद साधलाय.
उद्यापासून हिवाळी अधिवेशन; सरकारचा चहापानाच्या कार्यक्रमाला सुरुवात
महिलांच्या फसवणुकींची आयोग दखल घेत नाही; अंधारेंचा गंभीर आरोप
इंडिगो अजूनही विस्कळीत, आजही अनेक विमानं रद्द
हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूरात नेत्यांची बॅनरबाजी

