Special Report | मुंबई पालिकेसाठी ‘फिल्डींग’ सुरू, BMC चा सामना कोण जिंकणार?
VIDEO | 'मुंबई'चा सामना कोण जिंकणार? पक्षांचे जागांवरून दावे मात्र कोणाची बाजी? पाहा स्पेशल रिपोर्ट
मुंबई : आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसाठी आता फिल्डींग सुरू झाल्याचे पाहायला मिळत आहे. भाजपने दावा केलाय की, ते ठाकरे गटाला ५० हून कमी जागा रोखणार, तर बीएमसीत भाजपला ६० च्या आत ऑल आऊट करू असा इशाराच संजय राऊत यांनी दिलाय. एकावर्षाहून अधिक काळ लांबलेल्या मुंबई महानगर पालिकेसाठी चांगलाच सामना रंगताना दिसतोय. मुंबई कोणाची…यावरून दावे प्रतिदावे सुरू झालेत. येत्या काही दिवसांतच मुंबई महापालिकेची निवडणूक होण्याची चिन्हे आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपने कार्यकारिणीची बैठक घेतली. ज्यात ठाकरे गट ५० नगरसेवकांचा आकडाही गाठू शकणार नाही, असा आशिष शेलार यांनी केलाय. मुंबई महापालिकेत एकूण २२७ नगरसेवक निवडून जातात. त्यासाठी बहुमत ११४ जागांची गरज असते. २०१७ मध्ये मुंबई महापालिकेत शिवसेना ९७, भाजप ८३, काँग्रेस २९, राष्ट्रवादी ८, सपा ६, मनसे १ आणि इतर ३ असे बलाबल पाहायला मिळाले होते. मुंबई महापालिकेत सताधाऱ्यांचा कार्यकाळ हा गेल्या मार्चमध्ये संपलाय, तर निवडणुका लांबणीवर म्हणून ही सूत्र आता प्रशासकाकडे आहे. ३८ वर्षानंतर पहिल्यांदा मुंबईचा कारभार एका प्रशासकाच्या हाती आहे. मात्र यंदाची निवडणूक कधी होणार याकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे.
Published on: May 22, 2023 08:20 AM
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
