Ashish Shelar : मनसेच्या आंदोलनाची तुलना पहलगाम हल्ल्याशी; आशीष शेलारांचं मोठं विधान
Ashish Shelar On MNS : महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसाचारावर भाजप नेते मंत्री आशिष शेलार यांनी गंभीर वक्तव्य केले आहे.
महाराष्ट्रात मराठी भाषेच्या मुद्द्यावरून झालेल्या हिंसाचारावर भाजप नेते आणि मंत्री आशिष शेलार यांनी गंभीर वक्तव्य केले आहे. त्यांनी मुंबईत अमराठी व्यावसायिकावर झालेल्या हल्ल्याची तुलना जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याशी केली आहे. शेलार म्हणाले, पहलगाममध्ये धर्माच्या नावावर लोकांना लक्ष्य केले जाते, तर मुंबईत हिंदूंना केवळ त्यांच्या भाषेमुळे मारहाण केली जात आहे. यात काय फरक आहे? असा थेट सवाल शेलार यांनी उपस्थित केला आहे.
आशिष शेलार यांनी पुढे म्हटले की, दोन भावंडे एकत्र आल्याने आनंद होतो, आणि आम्ही संयुक्त कुटुंब पद्धतीवर विश्वास ठेवतो. मात्र, कालच्या सभेत एक भाषण अपूर्ण राहिले, तर दुसरे पूर्णपणे असंबद्ध होते. राज ठाकरे यांचे भाषण अपूर्ण होते, तर उद्धव ठाकरे यांचे भाषण सत्ता गमावल्याच्या वेदनेने भरलेले होते. त्यांच्या प्रत्येक शब्दातून खुर्चीची आठवण स्पष्ट दिसत होती, असे शेलार म्हणाले. शेलार यांनी या मारहाणीच्या घटनेला दुःखद आणि निंदनीय ठरवले, आणि भाषेच्या नावाखाली होणारा हा हिंसाचार पहलगाममधील धर्माच्या नावावर झालेल्या हिंसाचारासारखाच असल्याचे म्हटले. शेलार यांनी या मारहाणीच्या घटनेला दुःखद आणि निंदनीय ठरवले, आणि भाषेच्या नावाखाली होणारा हा हिंसाचार पहलगाममधील धर्माच्या नावावर झालेल्या हिंसाचारासारखाच असल्याचे म्हटले.