Ashish Shelar : ‘तुमको कभी देखा नहीं…’, मुंबईतील 26 जुलैच्या पुरात हे दोघं भाऊ कुठं होते? आशिष शेलार यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर 26 जुलैच्या मुंबई पुरावेळी अनुपस्थितीवरून प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले की, मुंबईकरांनी त्यांचा अहंकार नाकारला आहे आणि त्यांची "अस्तित्वाची लढाई" ही केवळ भावनिक खेळी आहे. फडणवीसांच्या नेतृत्वाचे कौतुक करत, त्यांनी ठाकरे बंधूंना खासगीकरण आणि भ्रष्टाचारावरून प्रत्युत्तर दिले.
आशिष शेलार यांनी ठाकरे बंधूंवर (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे) 26 जुलैच्या मुंबई पुरावेळी त्यांच्या अनुपस्थितीवरून तीव्र टीका केली आहे. शेलार यांनी प्रश्न विचारला की मुंबईकर पुरात अडकले असताना हे दोघे भाऊ कुठे होते, कुणी बंगल्यावर तर कुणी फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये होते. शेलार यांनी ठाकरे बंधूंच्या अस्तित्वाची लढाई या दाव्याला फेक नरेटिव्ह असे संबोधत, 2014 आणि 2017 च्या निवडणुकीत मतदारांनी त्यांना झिडकारल्याचे म्हटले.
आशिष शेलार म्हणाले की, आजही दोन्ही ठाकरे बंधू आणि त्यांचे पक्ष अहंकाराच्या परमोच्च बिंदूवर आहेत, जणू काही आम्हीच मराठी, आम्हीच मुंबई. या अहंकाराला मुंबईकर थारा देणार नाहीत. ही निवडणूक मराठी संस्कृतीची, महाराष्ट्राच्या विकासाची आणि मुंबईच्या विकासाची असून, मुंबईकर पंतप्रधान नरेंद्र मोदी, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहेत, असेही शेलार यांनी स्पष्ट केले.

