Ashok Chavan | संभाजीराजेंच्या टीकेला उत्तर देणार नाही, संभाजीराजेंबद्दल मला आदर : अशोक चव्हाण

अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत संभाजीराजेंनी अशोक चव्हाणांवर कडाडून टीका केली.

खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नांदेडमधील मराठा मोर्चाला संबोधित करताना, काँग्रेस नेते आणि मराठा उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यावर हल्लाबोल केला. “राज्यात अनेक जिल्ह्यात आंदोलनं झाली, त्यावेळी त्या त्या पालकमंत्र्यांनी उपस्थिती लावून पाठिंबा दिला. नांदेडचे पालकमंत्री कुठे आहेत? अशोक चव्हाण दिल्लीत सगळ्यांना भेटले, पण संभाजीराजेंना भेटण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नव्हता” असा घणाघात संभाजीराजेंनी केला. यावर अशोक चव्हाण यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

संभाजीराजेंनी अशोक चव्हाण यांच्याकडे उत्तर नाही म्हणून ते इथे आले नसावेत. आमच्या आंदोलनात सगळे आले पण अशोक चव्हाण का आले नाही? आम्ही सुद्धा 96 टक्के वाले मराठे आहोत, असं म्हणत कडाडून टीका केली होती. ज्यावर बोलताना अशोक चव्हाण म्हणाले, ”मला संभाजीराजेंबद्दल आदर आहे. आमचे आणि त्यांच्या घराण्याचे संबध हे पूर्वीपासूनचे आहेत. त्यामुळे मी त्यांच्या टीकेवर कोणतचं उत्तर देणार नाही.”

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI