Ashok Kharat Case | अशोक खरातची पत्नी कल्पना खरातलाही अटक होण्याची शक्यता
राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्यासह इतर आरोपींवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
राज्यात चर्चेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणाला नवे वळण आले आहे. शिर्डीतील जमीन खरेदी फसवणूक प्रकरणात तपास यंत्रणांनी मोठी कारवाई करत खरातसह पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात अशोक खरात, त्यांची पत्नी कल्पना खरात यांच्यासह इतर आरोपींवर फसवणूक आणि सावकारकी (मनी लेंडिंग) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपी अरविंद बावके आणि किरण सोनवणे यांना अटक केली असून, राहाता न्यायालयाने दोघांना तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुख्य आरोपी अशोक खरात याला यापूर्वीच अटक करण्यात आली असून तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. दरम्यान, पोलिसांनी कल्पना खरात आणि अशोक तांबे यांना अटक करण्याची तयारी सुरू केली आहे. शिर्डी परिसरातील जमीन खरेदी-विक्रीत मोठ्या प्रमाणात फसवणूक झाल्याचा आरोप असून, या प्रकरणात आणखी काही जणांचा सहभाग असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी व्यक्त केली आहे. पुढील तपास वेगाने सुरू आहे.
Published on: Mar 31, 2026 05:45 PM
श्रीमद्भागवत वाचल्यास अपघाती मृत्यू टळतो; अजित पवारांचा उल्लेख करत...
'पक्ष चोरून तुम्ही मालक होऊ शकत नाही' आदित्य ठाकरेंचा शिंदेंवर निशाणा
मुंबई महापालिका मुख्यालयातील उपहारगृह एफडीएच्या परवानगीने पुन्हा सुरू
ज्येष्ठ नागरिकांना मुलांना संपत्तीतून बेदखल करण्याचा अधिकार

