AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप, पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल

Ashwini Bidre Case : अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण; अखेर 9 वर्षांनी आरोपीला जन्मठेप, पनवेल सत्र न्यायालयाचा निकाल

| Updated on: Apr 21, 2025 | 12:47 PM
Share

Ashwini Bidre Case Verdict : 2016 मध्ये महाराष्ट्राला हादरवणाऱ्या अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणाचा निकाल आज अखेर 9 वर्षांनी लागला आहे. पनवेल सत्र न्यायालयाने मुख्य आरोपीला जन्मठेप सुनावली आहे.

अश्विनी बिद्रे हत्या प्रकरणातील आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी अभय कुरूंदकर याला या प्रकरणी न्यायालयाने जन्मठेप सुनावली आहे. हा निकाल न्यायालयाने राखून ठेवलेला होता. त्यावर आज सुनावणी झाली आहे. तब्बल 9 वर्षांनी अखेर या प्रकरणाचा निकल लागला असून आरोपी कुरूंदकर याला जन्मठेप सुनावण्यात आलेली आहे. अश्विनी बिद्रे यांची 2016 मध्ये हत्या झाली होती. या हत्येचा मुख्य आरोपी असलेल्या अभय कुरूंदकर याला जन्मठेपेच्या शिक्षेसह 20 हजार रुपयांचा दंड देखील ठोठावण्यात आलेला आहे. तर यातील इतर सहआरोपी असलेल्ययांना देखील न्यायालयाने शिक्षा सुनावली आहे. यात कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा झाली आहे. या संपूर्ण प्रकरणाचा निकाल पनवेल सत्र न्यायालयाने दिला आहे.

मुंबईच्या मीरारोड परिसरात अश्विनी बिद्रे यांची अमानुषपणे हत्या झाल्यानंतर अनेक महिने या हत्येचं गूढ कायम होतं. यात कुरूंदकर याच्याशी बिद्रे यांचा वैयक्तिक वाद असल्याचा आरोप होता. दरम्यान, हत्येनंतर मृतदेह नष्ट करण्यात आल्याचा देखील आरोप कुरूंदकर याच्यावर होता.

Published on: Apr 21, 2025 12:47 PM