Ashwini Bidre Murder Case : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपीला जन्मठेप
Ashwini Bidre Murder Case : अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर न्यायायलयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणात अखेर पनवेल सत्र न्यायालयाने निकाल दिला आहे. मुख्य आरोपी अभय कुरुंदकरला जन्मठेपेची शिक्षा आणि 20 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. उर्वरीत दोन आरोपींना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांना 7 वर्षांची शिक्षा सुनावली. पण या दोन आरोपीची शिक्षा पूर्ण झाल्याने त्यांना तुरुंगातून सोडण्याचे कोर्टाने आदेश दिले आहेत. अटक झाल्यापासून 7 वर्षांच्या कालावधीत आरोपी तुरुंगात असल्याने दोन आरोपींची शिक्षा पूर्ण झाली. त्यांची रिलीज ऑर्डर काढण्यात येणार आहे. अश्विनी बिद्रे यांच्या पतीने राजू गोरे यांनी आरोपींकडून भरपाई नको असे सांगितले होते. त्यामुळे तसा आदेश काढण्यात आलेला नाही.
सरकारला कोर्टाकडून सूचना देण्यात आल्या आहेत की त्यांच्या पगाराची भरपाई देण्यात यावी. ज्या अधिकाऱ्यांनी निष्काळजीपणा केला त्यांच्यावरही कारवाई करावी असा नवी मुंबई पोलीस आयुक्तांना आदेश देण्यात आला आहे. ज्या अधिकाऱ्यांनी अक्षम्य हलगर्जीपणा केला, अशा अधिकाऱ्यांवर कारवाई होणार. अधिकाऱ्यांवर विभागीय शिस्तभंगाची कारवाई करण्याची शिफारस. तत्कालीन पोलीस आयुक्त हेमंत नागराळे यांनीही यामध्ये दुर्लक्ष केल असल्याचे कोर्टाचे मत आहे. आरोपींविरोधात कारवाई न करता, चौकशी न करता आरोपींच्या राष्ट्रपती पदकासाठी शिफारस करणारे अधिकारी अडचणीत आले आहेत. या निकालाविरोधात वरच्या कोर्टात दाद मागण्यासाठी आरोपींना तीन दिवसांची मुभा देण्यात आली आहे.
काय आहे अश्विनी बिद्रे हत्या प्रकरण?
पनवेल सत्र न्यायालयाने हा निकाल दिला आहे. 2016 साली अश्विनी बिद्रे यांची मीरारोड येथे अमानुष हत्या करण्यात आली होती.
एप्रिल 2016 मध्ये अश्विनी ब्रिदे बेपत्ता झाल्या.
मीरारोडच्या घरात अभय कुरुंदकरने डोक्यात बॅट घालून अश्विनी ब्रिदेंची हत्या केली.
हत्या केल्यानंतर कुंदन भंडारी आणि महेश पार्डीकर या दोघांच्या मदतीने अश्विनी यांच्या मृतदेहाचे वूड कटरने लहान लहान तुकडे केले.
हे तुकडे काहीकाळ फ्रीजमध्ये ठेऊन नंतर ते वसईच्या खाडीत टप्याटप्याने फेकून दिले.
एका गोणीतून बॉडीचे तुकजे वसईच्या खाडीत फेकून दिले होते.
हत्येपूर्वी अश्विनी बिद्रे अभय कुरुंदकरला भेटल्या होत्या.
त्यानंतर दोघेही कुरुंदकरच्या मीरारोडच्या घरी गेल्याच लोकेशनवरुन निष्पन्न झालं होतं.
पोलिसांनी अश्विनी ब्रिदेंचा मोबाईल, लॅपटॉप आणि कुरुंदकरचा मोबाईलमधला डाटा रिकव्हर केला होता.
अश्विनी बिद्रे आणि मुख्य आरोपी अभय कुरुंदकर हे सांगलीत एकत्र कामाला होते.
