AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अहमदनगर येथे भर सभेत शिक्षकच एकमेकांना भिडले

अहमदनगर येथे भर सभेत शिक्षकच एकमेकांना भिडले

| Updated on: May 09, 2022 | 4:56 PM
Share

यावेळी सत्ताधारी शिक्षक संघटनेने विषयांचे वाचन न करताच मंजूर -मंजूर अश्याघोषणा दिल्या. यावर सभासद शिक्षकांनी तसेच विरोधकांनी आकक्षेप नोंदवला. पिढ्या घडवणारा समाजातील आदर्श शिक्षकच एकमेकांना भिडलेले दिसून आले.

अहमदनगर- अहमदनगर येथे माध्यामिक शिक्षक सहकारी सोसायटीच्या वर्षिक सभेत गोंधळ झाल्याची घटना घडली आहे. शिक्षकांच्या(Teacher)  दोन गटातील वादावादी इतकी टोकाला गेली की दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा व्हिडीओ (Video )समोर आले आहे. यामध्ये दोन एकमेकांच्यासोबत वाद घालत एकमेकांच्या अंगावर धावून जात धक्काबुक्की केली. एवढंच नव्हे स्टेजवरील माईकची तोडफोड करण्यात आली. यावेळी सत्ताधारी शिक्षक संघटनेने विषयांचे वाचन न करताच मंजूर -मंजूर अश्याघोषणा दिल्या. यावर सभासद शिक्षकांनी तसेच विरोधकांनी आक्षेप नोंदवला. पिढ्या घडवणारा समाजातील आदर्श शिक्षकच एकमेकांना भिडलेले दिसून आले. यावेळी पोलिसांनी(Police) हस्तक्षेप करत दोन्हीकडच्या लोकांना समज दिली.

Published on: May 09, 2022 04:56 PM