Nalasopara Gardulle Dadagiri | नालासोपाऱ्यात रात्री गर्दुल्यांची दादागिरी, तरुणाला बेदम मारहाण
व्हायरल झालेल्या व्हिडीओमध्ये एक तरुण हातात रस्त्यावर पडलेली एका लाकडाची वस्तू घेऊन हल्ला करण्यासाठी पुढे सरसावतो. पण एक जण त्याला थांबवतो. यावेळी मोठी बाचाबाची झाल्याचं दिसून आलंय. तर रस्त्यावरील अन्य जण राडा बघण्यासाठी गर्दी केल्याचंही व्हिडीओत दिसतंय.
नालासोपारा : मुंबईत अनेत ठिकाणी सऱ्हास गर्दुल्याच्या (Gardula) टोळींची दादागिरी पहायला मिळते. त्यांच्या या दादागिरीमुळे नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तर पोलिसांकडूनही यावर कानाडोळा होताना दिसत आहे. तर यांच्याकडे योग्यवेळी योग्य ती कारवाई करण्यात येत नसल्याने त्यांच्यात दादागिरी करण्याची वृत्ती वाढत आहे. असाच प्रकार नालासोपाऱ्यात (Nalasopara News) झाला असून येथे गर्दुल्याच्या टोळींनी रस्त्यावरून जाणाऱ्या एका तरुणाला अडवून, भर रस्त्यात लाथा बुक्यांनी आणि हातात पडेल त्याने बेदम मारहाण (men beaten) केली. या घटनेचा व्हिडीओ सध्या (Socia Media Viral) व्हायरल होत आहे. ज्यामुळे नालासोपाऱ्यात गर्दुल्यांच्या दादागिरीमुळे दहशत पसरली आहे.
मोठी बातमी! दोन दिवस कसून चौकशी, रात्रभर प्रश्नांचा मारा...अखेर
मुख्यमंत्र्यांच्या त्या वक्तव्यावर संजय राऊतांचं हटके उत्तर चर्चेत...
पेपरफुटीपासून आत्महत्यांपर्यंत….भाजपच जबाबदार, राऊतांचे गंभीर आरोप
गटातटांनी राष्ट्रवादीला पोखरलं... थेट सुनेत्रा पवार मैदानात उतरणार...
