Pahalgam Terror Attack: मोदींकडून सैन्याला ग्रीन सिग्नल, पाकची तंतरली अन् मध्यरात्री पत्रकार परिषदेतून मोठा दावा
नरेंद्र मोदी यांनी भारतीय सैन्यावर आपला विश्वास व्यक्त करत पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवण्यासाठी वेळ आणि टार्गेट ठरवा असं म्हणत सैन्याला ग्रीन सिग्नल दिल्याचे पाहायला मिळाले. यानंतर पाकिस्तानची चांगलीच तंतरली आहे.
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमध्ये चांगलाच तणाव वाढल्याचे पाहायला मिळत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मंगळवारी (29 एप्रिल 2025) तिन्ही सैन्याच्या प्रमुखांसोबत बैठक घेतली, तर त्याचा थेट परिणाम पाकिस्तानमध्ये दिसून आला. पाकिस्तानचे माहिती मंत्री अताउल्लाह तरार यांनी बुधवारी ट्वीटरवर एक वक्तव्य केलं. यावरून असंत दिसतंय की पाकिस्तानची चांगलीच घाबरगुंडी उडाली आहे. त्यांनी असा दावा केला की, आमच्याकडे विश्वसनीय गुप्तचर माहिती आहे की भारत येत्या 24-36 तासांत पाकिस्तानवर लष्करी कारवाई करू शकतो.
अताउल्लाह तरार यांनी यांनी भारतावर आरोप करत ते म्हणाले, कोणत्याही निष्पक्ष तपासाशिवाय भारताने थेट लष्करी मार्ग स्वीकारण्याची तयारी केली आहे, जो प्रादेशिक शांततेसाठी घातक ठरण्याची शक्यता आहे. तर पाकिस्तान सरकारने आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांच्या मदतीने या प्रकरणाचा निष्पक्ष, स्वतंत्र तपास करण्याची मागणी केली आहे. मात्र, भारताने हे मान्य न करता संघर्षाचा मार्ग निवडला असल्याचे म्हणत हे चूकीचे असल्याचे त्यांनी म्हटलंय.
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

