Latur | जलयुक्त शिवाराच्या कामात निसर्गाशी छेडछाड केल्यामुळे पूरस्थिती,अतुल देऊळगावकर यांचा आरोप

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रातील मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. मराठवाड्यातील पूरस्थितीला जलयुक्त शिवारची कामं जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे.

गुलाब चक्रीवादळाच्या प्रभावामुळं महाराष्ट्रातील मराठवाड्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झालीय. मराठवाड्यातील पूरस्थितीला जलयुक्त शिवारची कामं जबाबदार असल्याचा आरोप पर्यावरणतज्ज्ञ अतुल देऊळगावकर यांनी केला आहे. “जलयुक्त शिवारच्या कामात नद्यांशी छेडछाड केली गेली. नदीचं रुंदीकरण, खोलीकरण, सरळीकरण करणं हे नैसर्गिक प्रवाहाला अडथळा निर्माण करणारं होतं. त्यावेळेलाच महाराष्ट्रातील नामवंत जलतज्ज्ञ पोपटराव पवार, विजय बोराडे, प्रदीप पुरंदरे या सर्वांनी सांगितलं होतं की तुम्ही नदीशी छेडछाड करु नका. आता त्याची फळं आपण भोगत आहे. आपल्याकडे शास्त्रशुद्ध पद्धतीने कोणतीही गोष्ट केली जात नाही. ती थातूर मातूर पद्धतीने केलं जातं. सर्व कामं बिल्डरच्या, गुत्तेदारांच्या हातात आल्यामुळे ते म्हणतील तसं केलं जातं. त्यामध्ये तज्ज्ञांना कोणीही विचारत नाही, त्यामुळे त्याची ही परिणीती आहे” असं अतुल देऊळगावकर म्हणाले.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI