Video : औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू
औरंगाबादमधून (Aurangabad) काळीज चिरणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयाच्या दारात असलेल्या धर्मशाळेत रुग्णाचा मृत्यू झालाय. प्रकाश खरात (Prakash Kharat) असं घाटी रुग्णालयाच्या दारात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव आहे. घाटी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहाला […]
औरंगाबादमधून (Aurangabad) काळीज चिरणारी बातमी समोर आली आहे. औरंगाबादच्या घाटी रुग्णालय परिसरात एका रुग्णाचा तडफडून मृत्यू झाला आहे. घाटी रुग्णालयाच्या दारात असलेल्या धर्मशाळेत रुग्णाचा मृत्यू झालाय. प्रकाश खरात (Prakash Kharat) असं घाटी रुग्णालयाच्या दारात मृत पावलेल्या रुग्णाचं नाव आहे. घाटी रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे रुग्णाचा तडफडून मृत्यू झाल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. परिसरातील सामाजिक कार्यकर्त्यांनी मृतदेहाला अपघात विभागात दाखल केलं आहे. मात्र घाटी रुग्णालय प्रशासनाने रुग्णाला जिवंत असताना दुर्लक्ष केल्याचा आरोप लावण्यात येतोय.
Published on: Jul 27, 2022 12:01 PM
Latest Videos
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

