Aurangabad | औरंगाबादमध्ये गाडीत प्रवासी भरण्यावरुन वाहन चालकांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी
राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. बस गाड्या बंद असल्याने प्रवाशांची ओढाओढ करताना खाजगी वाहन चालकांची हाणामारी औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली.
औरंगाबाद : राज्यात एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. बस गाड्या बंद असल्याने प्रवाशांची ओढाओढ करताना खाजगी वाहन चालकांची हाणामारी औरंगाबादमध्ये पाहायला मिळाली. एसटी बंद असल्याने प्रवाशांची गर्दी झाल्यानंतर गाडी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांमध्ये प्रवासी भरण्यावरून फ्री-स्टाईल हाणामारी झाली. औरंगाबाद मधील सिडको बस स्थानकाजवळ हा प्रकार घडला. दोन वाहनचालकांनी एकमेकांना मारहाण केल्यानंतर जवळील नागरिकांनी वाद मिटवला. बस बंद असल्याने प्रवाशांची हेळसांड तर दुसरीकडे खासगी वाहन चालकांचे वाद वाढले आहेत.
Latest Videos
नगरसेवक बनायचं असेल तर... इच्छुक उमेदवारांवर गडकरींचं खास शैलीत सल्ला
कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेत भाजपचाच महापौर... नरेंद्र पवाराचा दावा
कार ते एक गुंठा जमीन, पुण्यात उमेदवाराकडून मतदारांना भन्नाट ऑफर्स
शेलारांना आठवले चावले, त्यांना पक्षात..संदीप देशपांडे यांची बोचरी टीका

