Vasai- Virar Breaking : मराठीचा अपमान अन् खळ्ळखट्याक! रिक्षा चालकाला चोपला
Vasai- Virar Viral Video : विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला आहे.
विरारमध्ये मराठीबद्दल अपशब्द वापरणाऱ्या रिक्षा चालकाला चांगलाच चोप दिला आहे. परप्रांतीय रिक्षा चालकाला मनसे आणि ठाकरेंच्या सेनेच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच चोपलं आहे. या घटनेचा व्हिडीओ आता सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे. विरार शहर प्रमुख उदय जाधव आणि शिवसैनिक तसंच मनसैनिकांकडून या रिक्षा चालकाला चांगलाच धडा शिकवण्यात आला आहे.
मराठी बोलणार नाही म्हणत मुजोरी करणाऱ्या रिक्षा चालकाला मनसे आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केलेली आहे. तसंच महाराष्ट्र आणि मराठी माणसाची माफी देखील या रिक्षा चालकाला मागायला सांगितली आहे. या रिक्षा चालकाने या पूर्वी मराठी भाषेबद्दल अपशब्द वापरले होते. त्याचा व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला होता. त्यानंतर आता मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेत या रिक्षा चालकाला चांगलंच चोपलं आहे. हा देखील व्हिडीओ सोशल मिडियावर व्हायरल झाला आहे.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर

