कराडच्या साऱ्या कच्च्या चिठ्ठ्याची चार्जशीटमध्ये पोलखोल, इतकं घडूनही जेलमध्ये बादशाही ट्रीटमेंट अन् CCTV बंद!
वाल्मिक कराडच्या साऱ्या कच्च्या चिठ्ठ्याची चार्जशीटमध्ये पोलखोल झाली आहे. पवनचक्की अधिकाऱ्याला जी धमकी दिली होती त्याच्या रेकॉर्डिंगचा शब्दां शब्द चार्जशीटमध्ये टाकला गेला. तर दुसरीकडे तुरुंगात वाल्मीक कराड गेल्यापासून सीसीटीव्ही बंद कसे असा सवाल देखील विचारला जातो आहे.
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा सूत्रधार वाल्मिक कराडच कसा आहे याचे अनेक पुरावे आता चार्जशीटमधून समोर येऊ लागले आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे संतोष देशमुख यांची हत्या ही खंडणीचा अडथळा ठरल्यामुळे झाली यावर देखील शिक्कामोर्तब होत आहे. पवन चक्की कंपनीचे अधिकारी सुनील शिंदे यांना आरोपी विष्णू चाटे यांच्या फोनद्वारे कराडने काम बंद करण्याची धमकी दिली होती. त्यावरून पोलिसांना प्राप्त झालेल्या रेकॉर्डिंगमधला संवाद चार्जशीटमध्ये टाकण्यात आला आहे. तपासात इतके सारे गंभीर पुरावे हाती लागूनही बीड कारागृहात वाल्मिक कराडला कुणाच्या सांगण्यावरून बादशाही ट्रीटमेंट मिळतेय, असा प्रश्न विरोधकांनी केला आहे. कारण बीडच्या ज्या जेलमध्ये कराड होता तिथलं सीसीटीव्ही अनेक दिवसांपासून बंद असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशमुख यांच्या निकटवर्तीयांनी सीसीटीव्हीच्या फुटेज बद्दल माहितीच्या अधिकारात माहिती मागवली होती. तेव्हा कराड ज्या कोठडीत होता तिथले सीसीटीव्ही कॅमेरे बंद आहेत. फुटेज बॅकअपसाठी जी यंत्रणा आहे, तिची ही केबल जळाली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर पोलिस अधीक्षकांनी सीसीटीव्ही कॅमेरे बसवणाऱ्या कंपनीला दुरुस्तीसाठीचे आदेश दिल्याचे सांगण्यात आलं आहे. वाल्मिक कराड देशमुख यांच्या हत्येचा सूत्रधार ठरल्यानंतर धनंजय मुंडेंनी अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. तर पंकजा मुंडेंना याबद्दल प्रश्न केल्यावर संतापलेल्या स्वरात उत्तर दिलं. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…

कराड-मुंडेंच्या सांगण्यावरून देशमुखांची हत्या,ठाकरेंच्या नेत्याचा आरोप

बंगरुळू हत्या प्रकरण : आरोपीच्या वडिलांनी सांगितला संपूर्ण घटनाक्रम

देशमुखांच्या हत्येचं शूटींग ज्या फोनमधून केल, त्याचा तपासणी अहवाल समोर

सावकाराच्या जाचाला कंटाळून तरुणाने उचललं टोकाचं पाऊल
