अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्राल…
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीने मंगळवारी आपला तपास अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. या अहवालात एफआयआर नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
अयोध्येतील राम मंदिरातील कथित देणगी चोरी आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली आहे. एसआयटीने मंगळवारी आपला तपास अहवाल राज्य सरकारकडे सादर केला. या अहवालात एफआयआर नोंदवण्याची आणि ट्रस्टची पुनर्रचना करण्याची शिफारस करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. तसेच राम मंदिर ट्रस्टचे प्रमुख चंपत राय यांच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत.
सूत्रांच्या माहितीनुसार, मंदिरातील देणग्यांच्या व्यवहारात अनेक अनियमितता आढळल्या आहेत. गेल्या 5 वर्षांतील आर्थिक व्यवहारांचे ऑडिट करण्याची शिफारस एसआयटीने केली आहे. देणगी व्यवस्थापनात पारदर्शकता नसल्याचा ठपकाही अहवालात ठेवण्यात आला आहे.
या प्रकरणात चंपत राय यांच्यावर दबाव वाढत असून ते राजीनामा देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपासादरम्यान ट्रस्टशी संबंधित अनेक कागदपत्रांमध्ये विसंगती आढळल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, राज्य सरकार हा अहवाल केंद्रीय गृहमंत्रालयाकडे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आगामी काळात या प्रकरणात मोठी कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
Published on: Jun 25, 2026 07:30 PM
अयोध्येतील राम मंदिरातील कथित चोरी प्रकरणाला वेगळंच वळण; थेट गृहमंत्रा
ठाकरेंचे बाकी तीन खसादर भाजपच्या... थेट पत्रकार परिषद घेत बड्यानेत्यान
खासदारांच्या बंडखोरीमागे देवेंद्र फडणवीस यांची मोठी भूमिका? 2 महिन्याआ
तब्बल 13 कोटी 99 लाख रुपयांच्या नुकसानानंतर विधानसभेत मोठी घोषणा!

