AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Hathras Stampede : सत्संग मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार

Hathras Stampede : सत्संग मंडपात चप्पलांचा खच, शंभरहून अधिक भक्त चिरडून ठार अन् बाबा झाला फरार

| Updated on: Jul 04, 2024 | 11:41 AM
Share

Hathras Stampede : बाबाचे सेवेकरी अनुयायांच्या व्यवस्थेत गलथानपणा करतात. सत्संगानंतर बाबा व्हीआयपी गाडीतून परत जात असताना लोक मागे धावतात आणि चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा जीव जातो. भोलेबाबा नावाचा एक बाबाच्या सत्संगामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर पडलेत.

भोलेबाबा नावाचा एक बाबा उत्तरप्रदेशातील हाथरसमध्ये लाखोंचा सत्संग भरवतो. बाबाचे सेवेकरी अनुयायांच्या व्यवस्थेत गलथानपणा करतात. सत्संगानंतर बाबा व्हीआयपी गाडीतून परत जात असताना लोक मागे धावतात आणि चेंगराचेंगरी होऊन १२१ जणांचा जीव जातो. भोलेबाबा नावाचा एक बाबाच्या सत्संगामुळे शेकडो कुटुंब उघड्यावर पडलेत. बाबा आला प्रवचन देऊन फरारही झाला पण बाबाच्या वाहनाची धूळ माथी लावण्यासाठी उसळलेल्या गर्दीत १२१ जण चेंगराचेंगरीमध्ये मेलेत. इतका खटाटोप ज्याच्यासाठी केला होता तो बाबा या घडलेल्या प्रसंगानंतर घटनास्थळावरून पसार झाला. ८० एकर शेत जमिनीला सत्संगाच्या नियोजनासाठी तयार करण्यात आलं. जवळपास दोन लाख माणसांची या जागेत गर्दी होती. तर या मंडपाबाहेरही लोक उभे होते. मंडपाच्या बाजूला पावसाचं पाणी साचल्याने भाविक घसरून पडल्याचा धोका होता. यापुढे नंतर बघा नेमकं काय घडलं?

Published on: Jul 04, 2024 11:40 AM