बागेश्वर बाबा यांच्याविरोधात तक्रार दाखल, काय नेमकं प्रकरण?
बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानानंतर नरेंद्र भोंडेकर आक्रमक झालेत. त्यांनी बागेश्वर बाबा विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे 27 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत चंदू बाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला मात्र हा कार्यक्रम सापडला वादात
बागेश्वर बाबा विरोधात भंडाऱ्यातील मोहाडी येथील पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भागवतकथा सप्ताहात वादग्रस्त विधान केल्याचा बागेश्वर बाबावर आरोप करण्यात आला आहे. बागेश्वर बाबाच्या वादग्रस्त विधानानंतर नरेंद्र भोंडेकर आक्रमक झालेत. त्यांनी बागेश्वर बाबा विरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे 27 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत चंदू बाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. पण हा कार्यक्रम आता वादात सापडला आहे. बागेश्वर बाबांच्या वक्तव्याने बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. बागेश्वर महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी 4 वाजतापर्यंत त्यांना अटक करावी, आणि सुरू असलेला कार्यक्रम बंद करावा. अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेवून बागेश्वर महाराजांना अद्दल घडवणार, असा इशाराही भोंडेकर यांनी दिला.
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

