बागेश्वर बाबा यांच्याविरोधात नागपुरात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?

बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे 27 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत चंदू बाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. पण हा कार्यक्रम आता वादात सापडला आहे. कारण नागपुरात एका पोलीस ठाण्यात बागेश्वर बाबा यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

बागेश्वर बाबा यांच्याविरोधात नागपुरात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल, नेमकं प्रकरण काय?
बागेश्वर बाबा यांच्याविरोधात नागपुरात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल
Follow us
| Updated on: Mar 31, 2024 | 7:12 PM

धीरेंद्र शास्त्री महाराज अर्थात बागेश्वर बाबा यांनी एका कार्यक्रमात वादग्रस्त वक्तव्य केल्याने नागपूरच्या कळमना पोलीस ठाण्यामध्ये त्यांच्या विरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. महान त्यागी बाबा जुमदेव यांच्या भक्ती आणि कार्याबद्दल आक्षेपार्य विधान केल्याचा आरोप करत त्यांच्या अनुयायाकडून निषेध व्यक्त करण्यात आलाय. तसेच त्यांच्याकडून धीरेंद्र शास्त्री यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. धीरेंद्र शास्त्री यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे प्रवचनातून बाबा जुमदेव यांचा उल्लेख करत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याचा आरोप करण्यात आलाय. धार्मिक भावनेला ठेच पोहचवून समाजात धार्मिक स्थिती निर्माण करत आहेत म्हणून त्यांच्यावर गुन्हा दाखल करुन मोहाडी येथे सुरू असलेल्या प्रवचनावर बंदी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

पूर्व विदर्भात प्रख्यात, मानवधर्माची शिकवण देणाऱ्या बाबा जुमदेव महाराज आणि त्यांच्या परमात्मा एक सेवकांबद्दल बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री उर्फ बागेश्वर महाराज यांनी भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे आयोजित कार्यक्रमादरम्यान काल सायंकाळी झालेल्या भागवत सप्ताहात आक्षेपार्य विधान केल्याचा आरोप केला जातोय. बागेश्वर बाबांच्या वक्तव्याने बाबा जुमदेव महाराज यांना मानणाऱ्या हजारो सेवकांच्या भावना दुखावल्या आहेत. बागेश्वर महाराजांविरुद्ध गुन्हे दाखल करून दुपारी 4 वाजतापर्यंत त्यांना अटक करावी, आणि सुरू असलेला कार्यक्रम बंद करावा. अन्यथा बाबा जुमदेव महाराजांचे सेवक कायदा हातात घेवून बागेश्वर महाराजांना अद्दल घडवतील, आणि याला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा भंडाऱ्याचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी दिला होता.

बागेश्वर बाबांचं नेमकं वक्तव्य काय?

प्रवचनादरम्यान बाबा बागेश्वर महाराज यांनी असा उल्लेख केला की, “मला कोणी सांगितलं की या भागातील परंपरेत काही असे हनुमानजीचे साधक आहेत पण ते आई-वडिलांना मानत नाही, प्रभू श्रीरामांना मानत नाहीत, राम राम म्हणत नाहीत. मला त्यांच्याशी काही वैर नाही. त्यांच्या श्रद्धेला माझा प्रणाम आहे. परंतु इतकं म्हणू शकतो की ते हनुमान भक्त राहू शकत नाही जोपर्यंत ते रामाचं नाव घेत नाही. असा कोणी हनुमानांचा सेवक होऊ शकत नाही ते धर्मविरोधी परंपरा असू शकते. तुम्हाला वाईट वाटेल तरी चालेल एक वेळ हंगामा कराल तरी चालेल पण मी सत्य बोलायला चुकणार नाही, कारण मी बाबरच्या छातीवर सुद्धा रघुवरांच नाव घेतल्याशिवाय राहणार नाही.”

बागेश्वर बाबांचा 2 एप्रिलपर्यंत कार्यक्रम

दरम्यान, बागेश्वर धाम सरकार यांचा दिव्य दरबार भंडारा जिल्ह्यातील मोहाडी येथे 27 मार्चपासून 2 एप्रिलपर्यंत चंदू बाबा स्टेडियम येथे आयोजित करण्यात आला आहे. इथे 7 दिवसीय हनुमंत रामकथेचेही आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवसांपूर्वी मोहाडीच्या चौडेश्वरी मंदिरातून भव्य कलश यात्रेला सुरुवात झाली. मोहाडी शहरातून कथा ठिकाणापर्यंत ही यात्रा पोहोचली. पंडित धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचे राम कथा वाचन दिव्य दरबार लागणार आहे. 2 एप्रिलला यज्ञ पूर्ण आवृत्ती आणि महाप्रसादाचे कार्यक्रम आयोजनही करण्यात आल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले आहे.

Non Stop LIVE Update
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?
एकनाथ खडसे आणि गिरीश महाजन एकत्र आले तर... पाटलांचं वक्तव्य नेमकं काय?.
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?
काय कमावल अन काय गमावल हे 13 जुलैला...जरांगे पाटलांचा नेमका इशारा काय?.
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट
गायब असलेला पाऊस 'या' दिवशी पुन्हा करणार कमबॅक, IMD चं मोठं अपडेट.
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक
जरांगे पाटलांना रेड कार्पेट आणि आमची दखलही नाही? ओबीसी नेता आक्रमक.
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका
तोडीबाज नेता, ब्लॅकमेलिंग आणि वसुलीत नंबर वन काम; बच्चू कडूंवर टीका.
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी
शरद पवार यांचं मुख्यमंत्र्यांना थेट पत्र अन् केली महत्त्वाची मागणी.
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका
मरतुकडी म्हैस ध्यानीमनी नसताना गाभण राहावी तसा राणेंचा...सामनातून टीका.
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?
Elon Musk याच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगानं फटकारलं, नेमकं काय प्रकरण?.
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत
लालपरीने शाळेत जाणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, विद्यार्थ्यांना आता शाळेत.
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात
Monsoon रखडला..आगेकूच मंदावली, विदर्भ प्रतिक्षेत तर कोकण, मराठवाड्यात.