बच्चू कडू यांचं ठरलं? नवनीत राणा यांच्याविरोधात देणार ‘हा’ उमेदवार , नाव आलं समोर
प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. आम्ही शिंद-फडणवीस सरकारकडे या मतदारसंघाची मागणी करू. त्यांनी मतदारसंघ नाही सोडला तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
अमरावती : प्रहार संघटनेचे नेते आणि आमदार बच्चू कडू यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघावर दावा केला आहे. आम्ही शिंद-फडणवीस सरकारकडे या मतदारसंघाची मागणी करू. त्यांनी मतदारसंघ नाही सोडला तर आम्ही स्वतंत्रपणे निवडणूक लढवू, असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. बच्चू कडू यांच्या या घोषणेमुळे अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांची डोकेदुखी वाढली आहे. खासदार राणा यांना आव्हान देण्यासाठीच प्रहारने जोरदार तयारी केल्याचं सांगितलं जात आहे. नवणीत राणा यांच्या विरोधात प्रहारचा उमेदवार ठरला असल्याचं सांगितलं जात आहे. नवनीत राणा यांच्या विरोधात बच्चू कडू यांच्या प्रहारकडून रवींद्र वैद्य संभाव्य उमेदवार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. त्यामुळे राणा विरुद्ध कडू वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?

