“शरद पवार यांना झालेल्या वेदना लहान नाहीत, पण…” बच्चू कडू नेमकं काय म्हणाले?
आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली.
अमरावती: आमदार बच्चू कडू यांनी सध्याच्या राजकीय घडामोडींवर महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस मधील बंडावर आमदार बच्चू कडू यांनी स्पष्ट शब्दात प्रतिक्रिया दिली. “आपल्या आई-बापावर निष्ठा ठेवा. शरद पवारांनी पक्ष उभारण्यासाठी जी मेहनत घेतली, त्यामुळे या बंडाचं दुःख मोठ आहे. राष्ट्रवादीची एक विचारधारा आहे आणि भाजपची वेगळी विचारधारा आहे. या विचारधारेची ही लढाई आहे. राष्ट्रवादीची विचारधारा ही सर्वधर्म समभावाची आहे. तर भाजपची विचारधारा ही हिंदुत्वाची आहे. प्रश्न युतीचा नाही तर विचारांचा आहे. पक्षाची आज जी काही विभागनी झालीय त्याचं दु:ख शरद पवार यांना असेल.एवढा मोठा पक्ष उभा करणं लहान गोष्ट नाही. आम्ही अजित पवार यांच्या बाजूने असलो तरी…”, बच्चू कडू नेमकं काय म्हणाले यासाठी पाहा हा व्हिडीओ…
मी केवळ शब्दाचा पक्का नाही, तर कामाचा माणूस आहे
दुबेंना मोदी-शाहांचा पाठिंबा होता का? वर्षा गायकवाड यांची टीका
सभागृहात न बसणाऱ्या खासदारांची पंतप्रधान मोदींकडून कानउघडणी!
मुंबईच्या महापौरपदाच्या निवडणुकीसाठी ठाकरेंची सेना उमेदवार देणार

