AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले

…तर उद्याच राजीनामा देतो; बच्चू कडू शेतकऱ्यांवर संतापले

| Edited By: | Updated on: Mar 12, 2022 | 11:00 AM
Share

राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे अनेकदा आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. मला मंत्रीपदाने काही फरक पडत नाही, तुमची इच्छा असेल तर मी उद्याच राजीनामा देतो असे बच्चू कडू यांनी आंदोलक शेतकऱ्यांना म्हटले आहे.

अमरावती : राज्यमंत्री बच्चू कडू (Bachchu Kadu) हे अनेकदा आपल्या वादग्रस्त व्यक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आता पुन्हा एकदा ते चर्चेत आले आहेत. विदर्भाती प्रकल्पग्रस्त शेतकरी (Project affected farmers) आपल्या विविध मागण्यांसाठी आठवडाभरापासून अमरावतीत (Amravati) उपोषणाला बसले आहेत. मात्र तरी देखील मागण्या मान्य होत नसल्याने बच्चू कडू यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी या शेतकऱ्यांनी केली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी या शेतकऱ्यांची भेट घेतली. मात्र यावेळी बच्चू कडू यांनी वादग्रस्त व्यक्तव्य केले आहे. तुम्ही न्यायासाठी उपोषणाला बसला आहात की, माझ्या राजीनाम्यासाठी असा सवाल करत, मंत्रिपदाने मला फरक पडत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे. तुमची ईच्छा असेल तर उद्याच राजीनामा देतो असे देखील यावेळी कडू म्हणाले.