Bachchu Kadu : नंगानाच सुरू… उपाशी माणसासमोर पुरणपोळी खाऊन मजा, लाज वाटली पाहिजे; बच्चू कडूंचा संताप कोणावर?
'कशाची भीती राहली नाही. जाती धर्माच्या नावावर निवडणुका जिंकल्या जातात. मशीनवर निवडणुका जिंकल्या जातात. मतदाराचा अंकुश संपल्यामुळे नंगानाच सुरू झाला आहे', असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर संताप व्यक्त केलाय.
संसद आणि राज्य विधिमंडळाच्या अंदाज समितीच्या सदस्यांसाठी आज राजेशाही थाट पाहायला मिळाला. खासदार- आमदारांसाठी चक्क चांदीच्या थाळीत पंचपक्वान्नाचा बेत होता. तर एका चांदीच्या थाळीचे भाडे ५५० रूपये तर भोजनाचा खर्च चार हजार रूपये होता, अशी चर्चा आहे. यावर बच्चू कडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. ‘सर्व भावना शून्य कारभार आहे. दिव्यांगांचा पगार सहा महिन्यापासून नाही. मजुरांना आठ महिन्यापासून पगार नाही, विधवा महिलांना पगार नाही. अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर चांदीच्या ताटामध्ये जेवत असाल तर ते उपाशी माणसाच्या समोर पुरणपोळीचा घास खाऊन मजा करायची असं आहे लाज वाटली पाहिजे, असं बच्चू कडू म्हणाले.
तर आज आणीबाणीला 50 वर्ष पूर्ण झाले याबाबत भाजपकडून पुन्नरूच्चार केला जात आहे. यासंदर्भात विचारणा केली असता बच्चू कडू म्हणाले, आणीबाणीपेक्षा भाजप काही फार चांगलं वागलं असं नाही आहे. तुम्ही आणीबाणी पेक्षाही भयंकर वागले, त्यामुळे तुम्हाला बोलायचं अधिकार नाही. “सौ चूहे खाकर बिल्ली हज चली” ही भाजप आहे. भाजप काँग्रेस पेक्षा वेगळी नाही आहे, असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर सडकून टीका केली.
जर धनंजय मुंडे यांना अटक न केल्यास... जरांगे पाटलांचा टोकाचा इशारा
सयाजी शिंदे म्हणाले, मला खूप आनंद... राज ठाकरेंच्या भेटीत काय घडलं?
हिवाळी अधिवेशनाचा कालावधी वाढणार? पहिल्याच दिवशी सभागृहात काय घडलं?
ते 22 आमदार मुख्यमंत्र्यांच्या हाती लागले... आदित्य ठाकरेंचा दावा काय?

