Bachchu Kadu : 6 दिवसांनंतर अन्नत्याग आंदोलन स्थगित; बच्चू कडू म्हणाले, जर सरकारनं विश्वास घात केला तर….
आज मंत्री उदय सामंत हे शासनाचं एक पत्र घेऊन अमरावतीतील मोझरीत दाखल झाले. त्यांनी सरकारची बाजू मांडली. त्यानंतर बच्चू कडू यांनी उपोषण सुटल्याचे जाहीर केले.
अमरावतीतून एक मोठी बातमी समोर आली आहे. गेल्या सहादिवसांपासून शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी यासह विविध मागण्यांसाठी प्रहार संघटनेने अध्यक्ष बच्चू कडू यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारले होते. दरम्यान, आज या आंदोलनाचा सातवा दिवस असताना बच्चू कडू यांनी आपले आंदोलन तूर्तास स्थगित केले आहे. शुक्रवारी अमरावतीचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बच्चू कडू यांची भेट घेत त्यांनी बच्चू कडू यांच्यासमोरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना फोन केला. यावेळी शेतकरी कर्जमाफी संदर्भात समिती नेमली जाईल, या समितीमध्ये बच्चू कडू हे देखील असतील, या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर कर्जमाफीचा निर्णय घेऊ असं आश्वासन फडणवीसांनी दिल्यानंतर आज मंत्री उदय सामंत यांनी बच्चू कडूंची भेट घेतली. यावेळी त्यांनी शासनाचं एक पत्र त्यांना वाचून दाखवले आणि बच्चू कडूंनी डेडलाईन देत आपलं अन्नत्याग आंदोलन तूर्तास स्थगित केलं. जर सरकारने दगाफटका केला, विश्वासघात केला तर मंत्रालयात घुसून प्रहार स्टाईलने आंदोलन करू असा इशाराच बच्चू कडू यांनी दिला.

भारतीयांसाठी अभिमानाचा क्षण! अंतराळवीर शुभांशू शुक्ला पृथ्वीवर परतले

मनसेच्या शिबिरात युती बाबत राज ठाकरेंचं मोठं विधान

मुलींच्या शरीरावरून कमेंट्स; पोलीस भरती तयारी करणाऱ्यांना मारहाण अन्..

आदित्य ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल, वांद्रे जमीन पुनर्विकासावरून सवाल
