Nagpur Farmer Protest : वेळ पडली तर रक्त… बच्चू कडूंचा आक्रमक पवित्रा, 4 महामार्ग रोखले, नागपुरात महाएल्गार
नागपूरजवळ बच्चू कडूंनी शेतकरी कर्जमाफीसाठी विराट आंदोलन पुकारले आहे. चार प्रमुख महामार्ग रोखून आंदोलकांनी वाहतूक थांबवली. बच्चू कडूंनी मुंबईत बैठकीसाठी जाण्यास नकार देत नागपुरातच चर्चा घेण्याची मागणी केली. नागपूर खंडपीठाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी या मागणीसाठी बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनांनी नागपूरजवळ तीव्र आंदोलन सुरू केले आहे. मंगळवारपासून आंदोलकांनी नागपूर-वर्धा, नागपूर-जबलपूर, नागपूर-अमरावती आणि नागपूर-भंडारा हे चार राष्ट्रीय महामार्ग रोखून धरले आहेत. टायर जाळून केलेल्या या आंदोलनामुळे या मार्गांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
बच्चू कडूंनी सरकारसोबतच्या बैठकीसाठी मुंबईला जाण्यास स्पष्ट नकार दिला आहे. त्यांनी सरकारला नागपुरात येऊन चर्चा करण्याचे आवाहन केले आहे. पूर्वीच्या अनेक बैठकांमधून कोणताही तोडगा न निघाल्याने यावेळी लेखी जीआरची मागणी करण्यात आली आहे. आंदोलनात अजित नवले, राजू शेट्टी, वामनराव चटप, रविकांत तुपकर आणि महादेव जानकर यांसारखे महत्त्वाचे शेतकरी नेते सहभागी झाले आहेत. नागपूर खंडपीठाने सायंकाळी ६ वाजेपर्यंत आंदोलनस्थळ रिकामे करण्याचे निर्देश दिले आहेत, तरीही बच्चू कडू यांनी कर्जमुक्ती मिळेपर्यंत माघार न घेण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान

