मंत्रिपदाचा प्रश्न विचारताच बच्चू कडू संतापले; म्हणाले, “आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का?”
राष्ट्रवादीचे नेते अजित पवार शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. दरम्यान मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केलेली आहे. यातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांची नाराजी दिसून आली आहे.
मुंबई: राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्यासह त्यांच्या काही सहाकारी शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाले आहे. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. त्यानंतर आता या नव्या मंत्र्यांना बंगले आणि दालनंही मिळाली आहेत. मात्र, अद्याप खातेवाटप झालेलं नाही. असं असलं तरी मंत्रिमंडळाचा विस्तार न झाल्यामुळे शिवसेनेच्या आमदारांनी अनेकदा जाहीर नाराजीही व्यक्त केलेली आहे. यातच आता पुन्हा एकदा बच्चू कडू यांची नाराजी दिसून आली आहे. बच्चू कडू यांना आमदारांमधील नाराजीबद्दल विचारल्यावर ते म्हणाले, “कोणताही आमदार आस लावून बसलेला नाही. केवळ तुम्हा पत्रकारांना वाटतं की, आमदार आस लावून बसलेत. आम्ही काय पिशवी घेऊन बसलोय का? वाटून टाकायला मंत्रिपद काय भाजीपाला आहे का? मुळात कोणी पिशवी घेऊन बसणार आहे का?”
गुंडांनी खाकी वर्दीवर उचलला हात, रोहित पवार चांगलेच भडकले, म्हणाले...
क्लासमध्ये वाद अन विद्यार्थ्याच्या मृत्यू, वडिलांची संतप्त प्रतिक्रिया
मोठी बातमी.. दोन ते तीन दिवसांत ठाकरे बंधू एकत्र? काँग्रेसशिवाय युती..
फडणवीसांनी निवडणुकीची घोषणा होताच महायुतीची रणनीती सांगितली; म्हणाले..

